महाड : दापोली - पंढरपूर रस्त्यावर असलेला महाड जवळील सावित्री नदीवरील जुन्या पुलाला आज आग लागली, ही आग एवढी भयानक होती की या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना काही वेळ वाहतूक थांबवावी लागली. महाड एमआयडीसी पोलीस तसेच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटना स्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
सावित्री पुलाखाली लागलेल्या आगीचा पारा वाढल्याने सावित्री पुलावरील रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्या असल्याचे दिसत आहेत. पुलावरील रस्त्याला भेगा पडल्या असल्याने पुल धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे, संबंधित खात्याने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर करत आहे.