डोंबिवलीत आगडोंब ; मंत्री रवींद्र चव्हाण तातडीने रवाना

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 12, 2024 07:26 AM
views 784  views

मालवण : डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा आगडोबं उसळला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीतील दुसऱ्या एका कंपनीला आग लागली आहे. यापूर्वीच्या जखमा ताज्या असतानाच दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे तातडीने डोंबिवलीला रवाना झाले आहेत. 

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधदुर्ग दौऱ्यावर होते. मालवण तालुक्याचा आढावा घेण्यासाठी ते मालवणात दाखल झाले होते. मात्र, घटनेचे वृत्त समजताच ते तातडीने डोंबिवलीला रवाना झाले आहेत.