नारायण राणेंचं काम सुपरफास्ट ; 24 तासात नांदगावात तुतारी एक्सप्रेसला मिळवला थांबा

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत केली होती मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 03, 2023 15:26 PM
views 747  views

कणकवली :  केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची काल दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबत सविस्तर चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेस ट्रेन ला थांबा देण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री राणेंनी नांदगाव रेल्वेस्थानक थांब्याची आवश्यकता सांगितल्यानंतर अवघ्या 24 तासांत केंद्रियरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली.

 त्याबाबतचे नोटीफिकेशनही रेल्वे बोर्ड चे जॉईंट डिरेक्टर विवेक सिन्हा यांनी जाहीर केले आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेस ला पूर्ववत थांबा मिळावा यासाठी नांदगाव पंचक्रोशीतून नागरिकांनी आंदोलनही केले होते. मात्र कोकण रेल्वे प्रवाशांना न्याय मिळत नव्हता. अखेर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी लक्ष वेधल्यानंतर तात्काळ केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नांदगाव येथे तुतारी एक्सप्रेस ला थांब्याला मंजुरी दिली आहे.