EXCLUSIVE | दोन महिन्यात निवडणूक लागू शकते, तयारीला लागा

उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना सूचना
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 18, 2023 15:59 PM
views 350  views
हायलाइट
सर्वांनी आता गल्लीबोळ्यात प्रचार करायचा
निवडणूक घ्या, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो
चोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेलंय, चोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.


यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाशिवरात्रच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेलेलंय, धनुष्यबाण चोरणाऱ्या चोराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्या चोरांना आज आव्हान देतोय, निवडणूक घ्या, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेनी शिवसैनिकांना देखील आवाहन केले. 'सर्वांनी आता गल्लीबोळ्यात प्रचार करायचा आहे, महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवणारे आणि दिल्लीचे तळवे चाटणारे शिवसैनिक असू शकत नाहीत. दोन महिन्यात निवडणूक लागू शकते, तयारी लागा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


निवडणूक आयोगाने धणुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयानंतर आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीआधी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला.