LIVE UPDATES

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील ५६ हवामान केंद्रांची आठ दिवसांत संयुक्त पाहणी करा

दादा साईल यांचे आदेश : चुकीच्या केंद्रांमुळे शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 03, 2026 05:44 PM
views 47  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात बसविण्यात आलेली काही हवामान केंद्रे चुकीच्या जागी बसविण्यात आल्याने विमाधारक शेतकरी विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत असल्याबाबत आज सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले तर जिल्ह्यातील ५६ हवामान केंद्रांची संयुक्तरित्या पाहणी करून येत्या आठ दिवसात वस्तुथिती दर्शक अहवाल सादर करा अशा सूचना कृषी सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले.

जिल्हा परिषद कृषी समितीची सर्वसाधारण सभा आज कृषी सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी दीक्षांत कोळप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, समिती सदस्य अक्षता गावडे, सुयोगी घाडी, शोभा गावडे, सुजाता पडवळ, विजय नाईक आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोक चळवळ निर्माण करून दहा हजार पेक्षा अधिक बंधारे बांधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी, नागरिक, शालेय विद्यार्थी, बचत गट महिला यांच्या अभिनंदनचा ठराव कृषी सभापती दादा साईल यांनी मांडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ हजार हेक्टर क्षेत्र  भात लागवडी खालील असले तरी प्रत्यक्षात २६,५६५ हेक्टर क्षेत्रावर या वर्षी भात लागवड झाली आहे. दुष्काळ स्थितीमुळे लागवडीचे क्षेत्र घटले असले तरी प्रशासनाच्या वतीने शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र शासनाकडून मंजूर होणारी नुकसान भरपाई कमी असल्याने ती वाढवून मिळावी. असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६ ठिकाणी हवामान केंद्र उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही केंद्रे चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने त्या परिसरातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. या बाबत सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले तसेच चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेली हवामान केंद्रे अन्य ठिकाणी हलविण्यात यावीत अशी सूचना केली. त्याबाबत चर्चा होऊन सभापती दादा साईल यांनी जिल्ह्यातील सर्व हवामान केंद्रांची कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी, संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या समवेत संयुक्त पाहणी करून आठ दिवसात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे बांधलेले बंधारे फुटण्याची शक्यता आहे. तरी ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे बंधारे फुटले तर तात्काळ त्यांची दुरुस्ती करावी असे आवाहन यावेळी कृषी सभापती दादा साहिल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशाही सूचना यावेळी केल्या.


ताजी बातमी

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise inspects grass harvesting and fodder storage demonstration at Kasal.
कसाल येथील गवत कापणी प्रात्यक्षिकास जिल्हाधिकारी, सीईओ, उपाध्यक्षांनी दिली भेट
November 03, 2026