वैभववाडी : प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक सुनील नारकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. भुईबावडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून श्री नारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
श्री नारकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मंगळवारी सायंकाळी भुईबावडा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, पुणे येथील गोल्डन मॅन शाम शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण, ब्युरो चीफ संदीप देसाई, माजी जि. प. बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मयुरी नारकर, सदानंद नारकर, सुवर्णा नारकर, अजिंक्य नारकर, उद्योजक रुपेश सावंत, माजी सभापती बापी मांजरेकर, संजय पवार, सभादेसाई, शरद नारकर, अशोक नारकर, प्रकाश मोरे, संजय पाताडे, बद्रीनाथ म्हात्रे, संदीप केळकर, संदीप म्हात्रे, सचिन गावडे, विमल शहा, करण भाई, केदार देशमुख, मनोज मारू, अजय भारद्वाज, अभिजीत सावंत, मनोहर मोरे, नरेंद्र मोरे, शशिकांत नारकर, तसेच मोठ्या संख्येने राजकीय लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक तसेच सुनील नारकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नारकर प्रेमी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे श्री नारकर यांनी सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले.
या सोहळ्यानिमित्त सतिश सावंत यांनी श्री नारकर यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. निस्वार्थीपणे सुरू असलेली जनसेवा त्यांनी अशीच सुरू ठेवावी. तसेच कृषी क्षेत्रात ग्रामीण भागात काम करावे त्याकरिता लागणारी मदत आम्ही करण्यास तयार आहोत, असा श्री सावंत यांनी शब्द दिला.
श्री. आंग्रे म्हणाले, शुन्यातून विश्व श्री नारकर यांनी निर्माण केले. त्यामुळे गरीबीची जाणीव त्यांना आहे. ते नेहमी सर्वसामान्यासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात. त्यांच कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत श्री आंग्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाम शिंदे, जयेंद्र रावराणे, सागर चव्हाण, बापी मांजरेकर यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.