नागपूर : लवजिहाद, गोहत्या आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चे काढण्यात आले. या मोर्चामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केले, अशा महाराष्ट्रातील विविध भागातील रणरागिनींचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटले. या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व आमदार नितेश राणे यांनी केले.
लवजिहाद, गोहत्या, धर्मांतर यासंदर्भात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या घटना घडल्या, तिथं जाऊन आमदार नितेश राणे यांनी मोठे आंदोलन उभा केलं. दोषींना कडक शिक्षा करण्याबरोबरच यासंदर्भात कायदा करण्याची मागणी केली. याच प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट असे हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले गेले. या मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रणरागिणींनी नागपुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात निवेदन दिले. या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व आमदार नितेश राणे यांनी केले.