३७ हजार गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण..!

Edited by:
Published on: November 04, 2023 17:21 PM
views 1143  views

मुंबई : राज्य सरकारने दीड लाख गिरणी कामगारांची सोडतीपूर्व पात्रता निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ दीड लाख गिरणी कामगारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेत आहे. आतापर्यंत ६६ हजारांहून अधिक कामगारांनी कागदपत्रे जमा केली असून कामगार विभागाने आतापर्यंत ३७ हजार ५६५ कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण केली आहे.