LIVE UPDATES

धनुष्यबाण चिन्हाचं काय होणार ? ; ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम

5 ऑक्टोबरपर्यंत ठाकरेंना बाजू मांडावी लागणार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 04, 2022 11:25 AM
views 802  views

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकड़ून शिवसेनेला 5 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली. 5 ऑक्टोबरपर्यंत उद्धव ठाकरेंना आता धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगासमोर होणार आहे. त्यासाठी शिवसेनेला आपली बाजू मांडण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून उद्या पर्यंतची मुदत देण्यात आलीय. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते आहे.

सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरु आहे. घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला मागच्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागलंय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला उद्यापर्यंत, अर्थात 5 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. उद्या दसरा मेळावा देखील आहे. अशातच दुसरीकडे याच दिवशी शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.