ईदचा मुस्लीम बांधवांमध्ये उत्साह

मिरवणुकीत माजी नगराध्यक्षांची हजेरी
Edited by: जुईली पांगम
Published on: October 11, 2022 11:39 AM
views 471  views

नाशिक | अनिल धामणे  ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यानिमित्ताने आज नांदगांव शहरात मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी होत, नांदगांव  नगरी चे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, रामनिवास कंलत्री यांनी सर्व बांधवांना 'ईद-ए-मिलाद'  शुभेच्छा दिल्या. 

यावेळी व्हीजे स्कूल के चेअरमन संजीव, धामणे यांनी अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती, अर्थात ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. त्यांचे विचार सर्व भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. समस्त मानव जात एक आहे अशी शिकवण ते देतात. त्यांनी मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे  या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत समाज निर्मितीचे प्रयत्न करूया. उत्सवाचे हे पर्व आपण सर्वांना सुख, समृद्धी घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी उपस्थित बांधवांना दिल्या. 


यावेळी माजी नगराध्यक्ष हाजी कुदरत हली शहा, रेल्वे कामगार यूनियनचे अध्यक्ष वामन पोतदार, माजी नगरसेवक संतोष गुप्ता, मेडिकल असोसिएशनचे महावीर सुराणा माजी नगरसेवक याकुब शेख, नांदगांव रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, बबलु सैय्यद जाबेद सम्राट फयाज शेख , दाऊद शेख,कलिम,शेख एजाज शेख, मुज्जु सोदागर यांच्यासह शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.