सावंतवडी : कोकणातील प्रतिपंढरपूर सावंतवाडीच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. यावेळी विठ्ठलाची पुजा व महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना केसरकर म्हणाले, पंढरपूरची पुजा पाहण्याच भाग्य आज मला लाभलं. न मागता विठ्ठलानं खुप काही दिल आहे. त्यामुळे वेगळं काही मागितलं नाही. आजची महापुजा ही महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक पुजा ठरली आहे. भक्तांच्या दर्शनात अजिबात खंड न पडता ही महापुजा पार पडली. वारकऱ्यांची काळजी घेणार हे शिंदे-फडणवीसांच सरकार आहे. तर विठ्ठलाच्या कृपेने सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटला आहे. सगळी कामं होण्यास सुरुवात झाली आहे. कबुलायतदार गांवकर प्रश्न सुद्धा पुढील आठवड्यात सुटेल असा विश्वास शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी सी.एल.नाईक, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, शशी नेवगी, रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, सुजित कोरगावकर, योगेश तेली, समीर वंजारी आदी विठ्ठल सेवक उपस्थित होते.