भवानीच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालो : डॉ .प्रमोद सावंत

Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 12:09 PM
views 586  views

सावंतवाडी : आपलं सर्वांचे मी आभार मानतो. भवानीची पुजा करण्याचा जो मान दिलात त्याबद्दल ऋणी आहे. आपण राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते माझा सत्कार केलात. सभापती म्हणून आलो तेव्हा त्यांची भेट झाली होती. सभापती असताना मुख्यपद मिळाव अशी मागणी सर्वांनी केली होती.

आज मुख्यमंत्री म्हणून आज मी कुणकेरीत आलो आहे. तुमच्या प्रेमाबद्दल मी आभार व्यक्त करतो. राज्याच्या व देशाच्या विकासासाठी काम करत राहू, नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनरी नेतृत्वाखाली काम करत राहू. विकसित भारतासाठी सर्वजण एकत्र येऊ असं मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.