आता येणार ‘दिशा सालियन फाईल्स’ | नितेश राणे यांचं मोठं विधान

गोत्यात कोण येणार ? याचीच चर्चा
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 01, 2023 16:57 PM
views 297  views

सिंधुदुर्ग : येत्या एक-दोन दिवसात सुधीर मुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरीला करमुक्त करावं, अशी विनंती करणार आहे. केरला स्टोरी पहिल्या दिवसापासून टॅक्स फ्री करावा म्हणून मागणी करणार आहे. केरला स्टोरी सारखाच काही दिवसात 'दिशा सालियन फाईल्'स हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिली आहे. दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांनी वेळोवेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे दिशा सालियनवर खरोखरच सिनेमा येणार आहे का? येणार असेल तर त्यात कुणावर आरोप केलेत? या सिनेमामुळे कोण गोत्यात येणार? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.


नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुंबईत तोडण्याचा डाव गुजरातमधून शिजतोय असं विधान राऊत यांनी केलं होतं. त्याचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला आहे. आता तुम्हाला शाह आडनावाची अ‍ॅलर्जी वाटतेय. तर गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो तुम्हाला?


तुमचा मालक बाहेरगावी जातो तिकडचा खर्च कोणाचा असतो? एक पैसाही उद्धव ठाकरेंच्या खिशातला जात नाही. यांचा सगळा खर्च हे उद्योगपती करत असतात. ते कसं चालतं? तेव्हा हे गुजराती महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार आहेत असं वाटत नाही का? असा सवाल करतानाच राजकारणासाठी द्वेष पसरवणं बंद करा, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.


संविधान धोक्यात आहे, असे संजय राऊत म्हणाले. संविधान धोक्यात असतं तर तुमच्या सारख्या कार्ट्याने रोज सकाळी 9 वाजता येऊन आमची सकाळ खराब केली असती का? संविधान पाळत असते तर आमच्या हिंदूंवर अत्याचार झाला नसता.रझा अकॅडमीचे लाड हे लोक करत बसले नसते. तुम्ही संविधानला मानत नाही आहात हे आम्हाला माहिती आहे. पंतप्रधानांनी टीका करणाऱ्यांची जी यादी सांगितली ते सामान्य लोक नव्हते तर ते काँग्रेसचे लोक होते, असं राणे म्हणाले.


यांना इथे शरीया कायदा लागू करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि या सर्वांचे धर्मांतर झाले आहे. 2019 ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं आहे. संजय राऊत हा महाभारतातला शकुनीमामा आहे. उद्या उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणे झाली तर त्याला जबाबदार संजय राऊतच असणार, हे आताच उद्धवजींना सांगून ठेवतो, असं ते म्हणाले.