कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची प्रत्यक्ष चौकशी राज्य उत्पादन विभागाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील बंगल्याची मोजमापे घेऊन या बंगल्याचे व्हॅल्युएशन केले जात आहे. राज्य उत्पादन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या हे मोजमाप केले जात आहे. या कारवाईने मालमत्तेची थेट चौकशी आता सुरू झाली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातो.
कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांचे घर होते, त्या ठिकाणी जुन्या घराच्या नव्याने बंगला बांधण्यात आलेला आहे. या बंगल्याचे बांधकाम किती स्क्वेअर फिट मध्ये आहे आणि त्याचे व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी मोजमाप घेतली जात आहेत. सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता श्रीमती प्रभू ,अभियंता प्रमोद कांबळी यांच्यासह राज्य उत्पादन विभागाचे एक पथ हे मोजमाप करत आहे. नाईक यांच्या बंगल्याची मोज मापे घेतल्यानंतर बंगल्याला किती कोटी रुपये खर्च आला आणि वैभव नाईक यांनी आपल्या व्यवहारात या बांधकामासाठी किती खर्च दाखवला आहे याचे ऑडिट केले जाणार आहे. तसेच शिरवल येथील फार्मसी कॉलेज हळवल मधील पाईप कारखाना या सर्वांची मोजमापे घेण्याचे काम आता सध्या सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच उ.बा.ठा.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रत्यक्ष चौकशीमुळे ते अडचणीत आले आहेत.
दरम्यान, काय चौकशी करायची ती करा, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही ठाकरे गातसोबत असल्याने ही चौकशी होत असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं.