मुंबई : अमित शाह यांच्यासोबत गुरुवारी दिल्लीमध्ये महाबैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अमित शाह यांनी खातेवाटप अन् मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर चर्चा झाली. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीची माहिती गुलदस्त्यात होता. आज मुंबईमध्ये होणार्या बैठकीमध्ये याला अंतिम स्वरुप मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकृत माहिती आज जाहीर होऊ शकते.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?
महायुतीच्या सराकरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहावे, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाने केल्याचं समजतेय. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही, हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आलाय. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय.