शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्र्यांची मान्यता !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 11, 2025 13:46 PM
views 288  views

मुंबई : मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनात राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवसृष्टी उभारण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत पुतळ्याच्या परिसरातील जागा संपादित करून परिसराचे सुशोभीकरण व संवर्धन करून तेथे शिवसृष्टी उभारण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीस अजित पवार यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून शिवसृष्टी उभारण्यासंदर्भात आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.