मुंबई : महाविकास आघाडी शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह तीनही पक्षांचे आमदार या वेळी उपस्थित होते.
मराठा समाजात असंतोषाची भावना,उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे मराठा समाज आत्महत्या करत आहे. राज्यपाल आपण दुवा आहात, आपण राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी बोला. आपण जरांगे पटलांशी बोला, त्यांना आश्वस्त करा. जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे. अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करा, प्रश्न सोडवा. सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल तर, आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन सहकार्य करू. हे सरकार एकमेकांवर ढकलत आहे, तिघांनी सामूहिक जबाबदारी घ्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.