सावंतवाडी : माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांची सावंतवाडीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
रामटेक येथील बंगल्यावर माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते सुरज परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. नव्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात केसरकर असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.