सावंतवाडी : नागपूरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
दीपक केसरकर यांनी नूतन सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तर शिंदे या पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.