
कणकवली : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर पोहचले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड तरुणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत तातडीचे बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर दाखल झाले आहेत.
ही बैठक डीएड तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी असली तरीही बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर याला विशेष महत्व प्राप्त झालंय.














