पुढील ६ तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 06, 2023 18:49 PM
views 196  views

सिंधुदुर्ग : आग्नेय अरबी समुद्रावरील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गेल्या ६ तासांत १३ किमी प्रतितास एवढ्या वेगाने उत्तरेकडे सरकले आहे, त्याचे रूपांतर तीव्र स्वरूपाच्या कमी  दाबाच्या क्षेत्रात  झाले आहे आणि आज, दिनांक ०६ जून, २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता  आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर  ११.९°उत्तर अक्षांश आणि ६६.०° पूर्व रेखांशा जवळ सदर कमी दाब क्षेत्र केंद्रित झाले आहे,

सदर कमी दाब क्षेत्र गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ९३०  किमी, मुंबईच्या नैऋत्येस १०६० किमी, पोरबंदरच्या ११५० किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या दक्षिणेस १४५० किमी आहे. 

पुढील ६ तासांत ते जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची आणि पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय भागात चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदेचे प्रमुख यांनी दिलीय.