‘सदर्न गर्ल्स’ च्‍या नृत्‍यावर रसिक मंत्रमुग्‍ध

कल्‍याण पूर्व येथील कोनार्क आयडिअल कॉलेजचे स्‍नेहसंमेलन रंगले
Edited by:
Published on: January 29, 2024 11:48 AM
views 266  views

कल्‍याण : कल्‍याण पूर्व येथील कोनार्क आयडिअल कॉलेजचे वार्षिक स्‍नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी रंगतदार झाले. या स्‍नेहसंमेलनात आलडिअल कॉलेजच्‍या ‘सदर्न गर्ल्स’ या गटाने सादर केलेल्‍या नृत्‍याने रसिकांची मने जिंकली. तसेच या गटाला स्‍नेहसंमेलनातील सर्वोत्‍कृष्‍ट घोषीत करण्‍यात आले. या गटाला सर्वात उत्तम नृत्‍य सादर केल्‍याने त्‍यांचा पारितोषिक देवून गौरव करण्‍यात आला.  


कल्‍याण येथील कॉलेजमध्‍ये २७ जानेवारी रोजी झालेल्‍या स्‍नेहसंमेलनात कॉलेजच्‍या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्‍नेहसंमेलन यशस्‍वी केले. सर्वच कार्यक्रम रंगतदार झाले. या कार्यक्रमांना रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. दरवर्षी या कॉलेजचे संमेलन आयोजित करण्‍यात येते. यावर्षी मात्र ‘सदर्न गर्ल्स’ गटाने सादर केलेल्‍या नृत्‍याने रसिकांची मने जिंकली आणि ‘बेस्‍ट परफॉर्मन्‍स’ हा किताब पटकावला. या गटाचा गौरव कॉलेजचे प्राचार्य शिरीन गाेन्‍साल्‍वीस यांच्‍या हस्‍ते ‘सदर्न गर्ल्स’ गटाचा पारितोषिक देवून गौरव करण्‍यात आला. यावेळी कॉलेजचे प्राध्‍यापक प्रसाद सर, नैना मॅडम, माधुरी मॅडम यांनी ‘सदर्न गर्ल्स’ गटाला व्‍यासपिठावर कला सादरीकरणासाठी मोलाचे सहकार्य केले. 

‘सदर्न गर्ल्स’ गटाने सादर केलेल्‍या ग्रुप डान्‍समध्‍ये कॉलेजच्‍या हेमांगी लक्ष्‍मण आडाव, दिशा भिलारे, रश्‍मिता, आरती चव्‍हाण, क्रिपा राऊत, साक्षी राऊत, रुचिता झा यांनी सहभाग घेतला होता. या गटाचे कॉलेजचे प्राचार्य गोन्‍साल्‍वीस आणि प्राध्‍यापक यांच्‍याकडून अभिनंदन करण्‍यात येत आहे.