शिवसेनेच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो गायब !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 23, 2023 17:57 PM
views 367  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी विविध राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी केली जाते. विविध ठिकाणी बॅनर लावले जातात. शिवसेनेच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनर ची जोरदार चर्चा आहे. हा बॅनर सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या या शिवसेनेने पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर चक्क मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. या बॅनरवर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, किरण सामंत, आमदार रवींद्र फाटक, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत, तर प्रामुख्याने शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, व तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांचे फोटो लावण्यात आले आहेत. हा बॅनर सोशल मीडियावर वायरल होत आहे.