सावंतवाडी : भावई देवीच्या दर्शनासाठी मी आज कुणकेरी गावात आलो. सिंधुदुर्गात वेळोवेळी कार्यक्रमासाठी येत असतो. सिंधुदुर्ग आणि गोवा यांच नातं गोवा मुक्तीच्या आधीपासून आहे. आरोग्य, रोजगारासाठी इथले लोक गोव्यात येत असतात. आरोग्याच्या बाबतीत चांगली सेवा गोवा सिंधुदुर्गला देत राहील.
आपल हे नातं असंच ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. सरकार कुठलंही असो हे नातं असंच राहील पाहिजे असं मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. कोकणसाद LIVEचे सल्लागार संपादक किशोर नाईक गांवकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेना दिनानिमित्त मालवणात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्यासाठी ते येत आहेत. गोवा सरकारकडून देखील आम्ही त्यांच स्वागत करत आहोत. कोकण बेल्टमध्ये नौदल दिन साजरा करत आहे ही गौरवास्पद बाब आहे. येणाऱ्या काळात सिंधुदुर्गत त्याचा बदल दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रविंद्र चव्हाण चांगलं काम करत आहेत असं ते म्हणाले. पक्षान सिंधुदुर्गात प्रचाराला पाठवल तर येणाऱ्या लोकसभेला सिंधुदुर्गात प्रचारासाठी येणार असल्याचं ते म्हणाले.