सावंतवाडी : शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून शहरात नरकासुर स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. आक्राळ विक्राळ असे एकापेक्षा एक सरस नरकासुर या स्पर्धेत सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिपावलीच्या पुर्वसंध्येला सावंतवाडीकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या दिवाळी गिफ्टची घोषणा मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये देव्या सुर्याजी, संतोष तळवणेकर, भाई शिर्के, हेमंत वागळे, संजू विर्नोडकर, मारूती निरवडेकर यांसह कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या योद्धांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मंत्री दीपक केसरकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नरक दहनानंतर दृष्टप्रवृत्तीचा वध होऊन लक्ष्मीची पावलं सुख अन् शांती घेऊन येतात. ही लक्ष्मीची पावल सर्वांच्या घरी येवो, सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तर सावंतवाडी हे अतिशय सुंदर शहर आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा सावंतवाडीत आले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भाजी मंडईची निर्मिती याठिकाणी करण्यात आली होती. मात्र, काळाच्या ओघात ही मंडई जीर्ण झाली आहे. येथील व्यापारी वर्गाला त्यांच्या असुविधांना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंडईच्या पुनर्निर्मितीसाठी १८ कोटी रू. मंजूर केले आहेत. त्याच टेंडर देखील निघाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याच भुमिपूजन करावं अशी विनंती करणार आहे. बॅ. नाथ पै नाट्यगृह अत्याधुनिक करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला असून अद्ययावत नाट्यगृह नव्या वर्षात उभं राहिलं. त्यामुळे रसिकांना ही सेवा देखील उपलब्ध होईल. तर खेळाडूंकडून स्टेडीअमसाठी मागणी केली गेली होती त्याकरीता ५ कोटी रुपये, ड्रेसिंग रूमसाठी १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मल्टीस्पेशालिटीच रखडलेल काम देखील पुन्हा सुरू होत आहे. अतिशय सुंदर अशी सावंतवाडी सर्वांना एकत्रीतपणे निर्माण करायची आहे.
यानंतर मंत्री केसरकर यांनी नरकासुर मंडळांना भेट देत उपस्थितीतांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दिलीप भालेकर, दत्ता सावंत, आबा सावंत, विशाल सावंत आदी उपस्थित होते.