
मुंबई : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. मी ते जवळून अनुभवले आहे. त्यांचे देहदान, रक्तदान हे उपक्रम बहुचर्चित आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेला मरणोत्तर देहदानाचा उपक्रम वैद्यकीय शिक्षण घेणार्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहे.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानला शुभेच्छा देताना ते बोलत होते. ते आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे म्हणाले की, आजपर्यंत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या माध्यमातून नरेंदाचार्य यांच्या प्रेरणेने 81 जणांनी देहदान केले आहे. मृतांचे पार्थिव त्या त्या भागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुपूर्त केले आहेत. यातील 12 जणांनी अवयव दानदेखील केले आहे. जानेवारीत संस्थानर्फे 1239 रक्तदान शिबिरे झाली. त्यात विक्रमी एक लाख 36 हजार 270 बाटल्या रक्तसंकलन झाले. हे सर्व रक्त शासकीय रुग्णालयातील गोरगरिबासाठी वापरले जात आहे. संस्थानचे सारे उपक्रम शासनाला मदत करणारे असेच आहेत. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दात त्यांनी संस्थानचा गौरव केला.