उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा करिष्मा..!

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 20, 2022 15:26 PM
views 415  views

नागपूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सरपंच व सदस्य निवडून आले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला.