पुतळ्यांच्या उंचीबाबत धोरणात बदल

Edited by:
Published on: September 09, 2024 08:13 AM
views 416  views

मुंबई : आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे. पुढील १५ दिवसांत राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार असून यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.