कणकवली : महाविजय 2024 अभियान साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 19 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात विविध बैठका,सभा,भेटीगाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
19 रोजी दुपारी 3 वाजता खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत बावनकुळे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे.त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात भाजपा सुपर वारीयर्स सोबत बैठक होईल. त्यानंतर प. पू.भालचंद्र महाराज मठात जावून ते दर्शन घेणार आहेत. घर चलो अभियान अंतर्गत पटकीदेवी मंदिर पासून कणकवली मुख्य चौक मार्गे भाजपच्या दुर्गामाता उत्सव कार्यक्रमापर्यंत ते चालत नागरिकांशी संपर्क साधणार आहेत.त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता कणकवलीत कॉर्नर सभा होईल. त्यानंतर ते सावंतवाडी तालुक्यात जाणार आहेत. या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वॉररूमचे उद्घाटन श्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रदेश भाजपा पदाधिकारी विक्रांत पाटील,बाळ भेगडे, केशव उपाध्ये ,संदीप जी आदी उपस्थित असणार आहेत.2024 च्या निवडणूक मध्ये पंतप्रधान मोदी हेच पुन्हा पंतप्रधान असतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग चा खासदार हा युती चाच असणार आहे. मागील 9 वर्षात निष्क्रिय खासदार असल्याने लोकसभा मतदारसंघाची पीछेहाट झाली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही राऊत विकासकामे करू शकले नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही विकासकामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही महायुती चाच उमेदवार निवडून आणणार आहोत. भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष जो उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, महिला प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,आदी उपस्थित होते.