कुडाळ : एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल येथील कर्करोग विभाग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्करोग बाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरला आहे. येथील डॉ. अनुप ताम्हणकर (एम.सी.एच. ऑन्को सर्जन) डॉ. नवीनचंद्र (एम.बी.बी.एस., एम.एस.), डॉ. शैलेंद्र शिरवडकर (भूलतज्ञ), देवेंद्र घाडीगावकर (ओ.टी. टेक्निशियन), यांच्या संपूर्ण टीमने HIV बाधित महिलेची यशस्वी कर्करोग शस्त्रक्रिया करून सदर महिलेचे प्राण वाचविले.
सदर शस्त्रक्रिया अतिशय किचकट स्वरूपाची होती तसेच रुग्ण HIV बाधित असल्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये खूपच कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. तरी एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल येथील कर्करोग विभागातील तज्ञ डॉक्टर आणि इतर ओ.टी. स्टाफ यांनी हि शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी करून रुग्णाचे प्राण वाचविले.