सावंतवाडी : आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त करण्यात आली असून महाविकास संकल्प २०२४ साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत. १९ ऑक्टोबरला ते कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना विकासकामे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे १७ ऑक्टोबर पासून कोकण दौऱ्यावर येत आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी १९ ऑक्टोबरला सायंकाळी तीन वाजता कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील, महाविकास संकल्प 2024 या अभियानात प्रत्येक घरोघर वॉरियर्स जाऊन मातीचा कलशामध्ये तीनशे आठ ठिकाणाहून माती गोळा करून कणकवलीत जमा करून ती दिल्ली येथील पाठवण्यात येणार आहे. दिल्ली या ठिकाणी शहिदांच्या स्मारकातील अमृतवाटिकेला ही माती प्रदान केली जाणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.
तर येथील ताज हॉटेलच्या जमिनीबाबत राजन तेली यांनी उत्तर देताना सांगितले की, वेळागरवासीयांची भूमिका समजावून घेऊन निर्णय घेण्यात यावा, गेली ३२ वर्षे हे जमीन मालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काम कोणी केले याला आपला विरोध नसल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, राजन म्हापसेकर, श्वेता कोरगावकर, रवींद्र मडगावकर,महेश धुरी प्रथमेश तेली अजय गोंदावळे दिलीप भालेकर प्रमोद कामत आदी उपस्थित होते.