Mumbai : फडणवीस सरकारच खातेवाटप अखेर जाहीर झालं. अखेर ही प्रतीक्षा संपलीय. ज्या गृहखात्यावरून ड्रामा रंगलेला ते खात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कायम राहिलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण खातं आलय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं पुन्हा आलय. तर पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना कुठलं खात मिळेल याकडे सिंधुदुर्गाच्या नजरा लागल्या होत्या. पाहुयात नितेश राणे यांच्यासह इतर मंत्र्यांकडे कोणती खाती आलीत पाहूयात संपूर्ण यादी एका क्लिक वर......
कॅबिनेट मंत्र्यांची खाती
1) देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक - वनमंत्री
11) दादा भुसे - शालेय शिक्षण
12) संजय राठोड - जलसंधारण
13) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
15) उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
19) अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे - महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे - कृषी
26) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे - कापड
29) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक - वाहतूक
31) भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
32) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर - कामगार
35) बाबासाहेब पाटील - सहकार
36) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्र्यांची खाती
1) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार
2) माधुरी मिसाळ - शहर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
3) पंकज भोयर - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शाळा शिक्षण, सहकार, खाण
4) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, एनर्जी, महिला आणि बालकल्याण
5) इंद्रनील नाईक - औद्योगिक, उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
6) योगेश कदम - गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधे प्रशासन