भाजपने 'फायटर आमदार' गमावला ; मुक्ता टिळक यांचं निधन !

Edited by: ब्युरो
Published on: December 22, 2022 17:34 PM
views 508  views

पुणेः पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान पुण्यात निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातीलखासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पु्ण्याचे महापौर पदही त्यांनी भूषवले होते. आमदार मुक्ता टिळक यांच्यावर आता उद्या सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता.

सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते.

पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांची कामगिरी श्रेष्ठ ठरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामामुळे आमदारकीवर आपले नाव कोरले होते.

मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं होते त्यानंतर त्यांनी एमबीएही केले होते.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर पुण्याबरोबरच इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  भाजप नेत्यांनी त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच आमच्या पक्षाचीही मोठी हानी झाली असल्याची भावना भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी आपल्या कामगिरीमुळे वेगळा ठसा उमटविला होता.