
देवगड : भारतीय जनता पक्षाचे (भा.ज.पा.) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज आपल्या कुटुंबासह देवगड तालुक्यातील कुणकवण येथील त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणेशाची पूजा करून आरतीही केली.
श्री.तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ता.३०त्यांनी मुळ गावी कुणकवण येथील गणरायांचे दर्शन घेतले. निवसास्थानी विराजमान झालेल्या बाप्पांची पुजा करुन आरती केली. श्री.तावडे यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याशी चर्चा केली.