एक जन्मतारीख, एक निर्णय अन् एकच महत्त्वकांक्षा !

दोन उप मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एकाच दिवशी
Edited by: विनायक गावस
Published on: July 21, 2023 20:17 PM
views 240  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री शिंदे सरकारमध्ये पहायला मिळत आहेत. त्यातील अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत. तर मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. २०१९ ला बहुमत कुणालाही नसल्यानं पहाटेचा शपथविधी झाला त्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. तीन दिवसांच हे सरकार कोसळलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडीच सरकार आलं. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारच कायम राहिले. त्यातच एका वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं अन् महाराष्ट्रात तिसर शिंदे सरकार स्थापना झाल. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्षनेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केली. यातच दोन आठवड्यांपूर्वी अजित पवारांनी बंड करत सरकारला पाठिंबा दिला अन् महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. आज हे दोघेही उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या दोघांचाही जन्म एकाच तारखेला झालाय. आज २२ जुलै रोजी या दोघांचाही वाढदिवस आहे. त्यात दोघांचीही महत्वकांक्षा ही एकच आहे. दोघांनाही महाराष्ट्राच मुख्यमंत्री बनायच आहे. त्यात फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पाच वर्ष कारभार चालवणारे सीएम आहेत. तर अजित पवारांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची हुलकावणी देत आहे. 


दरम्यान,  इर्शाळवाडी येथील दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी 22 जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग बॅनर लावू नये तसेच जाहिरात देखील करू नये असे आवाहन केले आहे.  तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले आहे. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो. त्यामुळे वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी इर्शाळवाडीसाठी वापरण्यात यावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर वाढदिवसाचा निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणा'

या घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. परंतु इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.