जनरल जगन्नाथराव भोसले यांच्यावरील जीवनचित्र प्रदर्शन

जनरल जगन्नाथराव भोसले आजाद हिंद सेनेचे सरसेनापती
Edited by:
Published on: July 28, 2022 17:16 PM
views 244  views

पिंपरी पुणे : 

'आजादी का अमृतम महोत्सव' उपक्रमा अंतर्गत डीएफएल द्वारा आयोजित आझाद हिंद सेना प्रदर्शन व परिषदेचे आयोजन दि. २५,२६,२७जुलै २०२२रोजी करण्यात येत आहे. याप्रसंगी आजाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या जीवनावर आधारित प्रथमच चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महावीरचक्रविजेते विंग कमांडर जेएम.नाथ',महावीरचक्र विजेता मा.दिगेंद्र कुमार, एअर चीफ मार्शल मा.भुषण गोखले इ.मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. आझाद हिंद फौज परिषदेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वर्षे साजरी करण्यात आली. जगन्नाथराव भोसले मेजर जनरल जीआर नगर, कॅप्टन शांघारा सिंग मान, कॅप्टन गोविंद राव किरडे, लेफ्टनंट पी एन ओक, श्री पोस्वुयी स्वुरो, परमानंद यादव यांच्या आझाद हिंद फौज कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी आझाद हिंद फौजेच्या २६ हजार हुतात्म्यांचे युद्ध स्मारक बांधण्याची जोरदार मागणी केली.

प्रदर्शनात आजाद हिंद फौज, भारतीय सेना , भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील दुर्मिळ पुस्तके , वृत्तपत्रे , नाणी , फोटोज यांचे संग्रह लावण्यात आले होते . मध्यप्रदेश मधील शिक्षक निनाद जाधव यांचे वर्ल्ड रेकॉर्ड कलेक्शन, डॉक्टर बाळकृष्ण लळीत यांचे दुर्मिळ वृत्तपत्र संग्रह, एअर फोर्स वेटरन शरदचंद्र फाटक यांचे फायटर प्लेन व माहितीचे फोटो संग्रह, विद्यार्थ्यांचे सैनिकांसाठी बनवलेले ग्रिटींग कार्ड्स यात होते .

दुसरा दिवस 25 जुलै , 1971 युद्ध स्वर्णिम विजय वर्ष उत्सव वीरचक्र पुरस्कार विजेते - विंग कमांडर सुरेश कर्णिक आणि कर्नल पीएस संघा यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कीर्तीचक्र हवालदार संतोष राळे, शौर्यचक्र नाविक आनंदराव सावंत, कमांडो रामदास भोगडे उपस्थित होते. २६ जुलै, कारगिल विजय दिवस अतिथी कर्नल वीरेंद्र थापर (कारगिल युद्धातील वीरचक्र शहीद कॅप्टन विजयंत थापर यांचे पिता), अटौली केनगुरुसे (शहीद कॅप्टन एन केनगुरुसे यांचे बंधू, महावीरचक्र, कारगिल), यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कारगिल युद्धाचे कमांडर -
लेफ्टनंट जनरल अमरनाथ औल (.UYSM, PVSM, AVSM), मेजर जनरल लखविंदर सिंग (YSM) कारगिल युद्धाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजक DFL India संस्थापक अध्यक्ष नरेश गोल्ला, कमांडो रघुनाथ सावंत (2nd पॅरा) JWO शरदचंद्र फाटक (एअर वेटरन्स असोसिएशन), राजेंद्र जाधव (संचालक DFL), निलेश विसपुटे आणि शुभम शर्मा सुरेंद्रजी भोसले, बाळकृष्ण लळीत, संजीव मतकर, माया मतकर, विद्या लळीत, अजय खोमणे, सिद्धाराम बिराजदार, सनी अग्रवाल, सुनील वडमारे, गणेश गेजगे, श्रीहरी सोनकांबळे, मंगेश पालकृत, गणेश खुडे, मुजीब खान, रुषिकेश जाधव, मिस कोमल मोजिद्रा, संदिप कांबळे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. वेखो स्वुरो यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश विसपुते यांनी केले.