कणकवली : संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहे. मोठया तावाने बोलतोय. मराठी बांधवांसाठी प्रचाराला गेलाय म्हणतोय. या शकुनी मामाला विचारायचं आहे. जून विसरला असशील तर थोडं मुद्दामहून आठवण करून देतो. याच म्हणणं बेळगाव आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही. संजय राजाराम राऊतने एवढ्याच।प्रश्नाचं उत्तर द्यावं. बाळासाहेबांचं हे बेळगावसाठी आंदोलन सुरू होत तेव्हा तू कुठे होतास? सामनात होतास की लोकप्रभात. सरडा जसा रंग बदलतो तसा हा कारटा आहे. तेव्हा हा समाजवादी विचारसरणीचा होता. हिंदू विरोधात तेव्हा याने अनेक आर्टिकल लिहिली आहेत, असा घणाघात आमदार नितेस राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, मी पुन्हा पुन्हा सांगतो, सगळी मराठी माणस विसर, पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल बोल. तुला मराठी माणसांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. तू लिहिले आर्टिकल एकदा वाचून दाखवणार आहे,मग तुला लोक चपलांनी मारतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मध्ये आग लावली आणि आज सामनात पवार कुटुंबियात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आज अग्रलेखातून परत सिद्ध झालय, आग लावण्याचे काम करतोय.
ते म्हणाले, संजय राऊत प्रचाराला यायचा नसेल तर ऑफर दिली गेली. आमच्या उमेदवाराने ती ऑफर फेटाळली. जर ती ऑफर स्वीकारली असती तर हा आज बेळगावला गेला नसता. जसा मालक तसा कामगार, जसा कामगार तसा मालक. उद्धव ठाकरे याहून वेगळे नाहीत. एक साधा संपादक आहे, मग एवढ्या गाड्या कुठून येतात? त्याच्या घरात लागलेल्या गाड्या बघा. एवढ्या महागड्या गाड्या वापरणारा दुसरा कुठला संपादक आहे. याचा ब्लॅकमेल हाच धंदा.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बारसुच्या समर्थनार्थ पत्र लिहिलं. माझ्या माहितीप्रमाणे त्या पत्राची किंमत 100 कोटी रुपये होती, असा आरोप करून ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मला एका मोठया उद्योगपतीचा फोन आला. म्हणाला उद्धव ठाकरेंकडे रेट कार्ड आहे.उद्धव ठाकरेंचे भाषण हवं असेल, व्हिजिट हवी असेल तर एवढे एवढे कोटी. आता पण बारसुसाठी रेट कार्ड मधला कुठला आकडा फायनल झाला हे उद्धव ठाकरेंनी बारसुत आल्यावर सांगावं. राणे साहेबांनी विधिमंडळात सांगितलं होत की जैतापूरसाठी 500 कोटीची डिल झाली.उद्धव ठाकरेंनी हे कधीच नाकारल्याचे-सांगितल्याचे ऐकीवात नाही.
जेव्हा जेव्हा मुंबईची निवडणूक जवळ येते तेव्हा तेव्हा मुंबई तोडण्याची वक्तव्ये केली जातात. पवार साहेब असे म्हणतात,दिल्ली स्तरावर मुबईला केंद्रशासित करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही.हे जरा वाच. यापुढे उद्धव ठाकरे किंवा त्याचा तो मुलगा किंवा अन्य कोणी ही मुंबईच वातावरण खराब केलं तर यांना मुंबईत फिरायला द्यायचं की नाही हा विचार करावा लागेल.
6 तारखेला बारसुत प्रकल्पाच्या समर्थनार्थ सर्व लोक एकत्र येणार आहोत.केंद्रीयमंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत, निलेश राणे, मी व अन्य सर्व एकत्र येणार.आम्हाला ही प्रशासनाने ग्राउंड उपलब्ध करून द्यावं. आम्ही राज्य सरकार,पोलीस प्रशासन यांना विनंती करतो,आम्हाला पण 6 तारखेला परवानगी द्यावी. आम्हाला पोटापाण्यासाठी नुसता विरोध करायचा नाही आहे,आम्हाला तिथे विकास हवाय. याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या भ्रष्टाचारामुळे मुबईचा मराठी माणूस वसई विरारला फेकला गेलाय.
आम्ही 6 तारखेला एकत्र येणार.परवानगी मिळाली की वेळ कळवू.आम्हाला कोणाशीही संघर्ष करायचा नाही. संजय राऊतवर चोरीची केस आहे,बेलवर बाहेर आहे त्याने भाजपवर चोरीचा आरोप करू नये. 6 तारखेला मोर्चा काढून सभा होईल.रिफायनरीला समर्थन मोठया प्रमाणात आहे हे सर्वांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत. उद्धव ठाकरे आणि कंपनीचा विरोध हा स्वतःच्या बॅलन्सशीट साठी आहे. निलेश राणेंना तिथलं टाचणी टाचणी बद्दल माहिती आहेत त्यांनी अगर घातपातीचा सांगितलंय तर पोलिसांनी गंभीरपणे घ्यावं. आमचा पॉझिटिव्ह मोर्चा असेल....समर्थनार्थ, असेही त्यांनी सांगितले.