मुंबई : राज्यात अनेक नेते मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हे असतानाच काल चंद्रकांत पाटील यांनी देखील वादग्रस्त विधान केले. त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला. हे घडत असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याकडे असलेल्या व उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी हा राजीनामा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे तर राजीनाम्याचं पत्र त्यांनी फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय विधान केलं होतं?
शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.