BIG BREAKING : आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 08, 2023 14:46 PM
views 527  views

नाशिक : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.


नेमकं काय आहे प्रकरण – 

नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. यानंतर आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरू होती.

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याआधीही तत्कालीन जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री ​​बच्चू कडू यांना 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला होता.