कुडाळ : आदरणीय नारायण राणे साहेबांचे राजकीय जीवन मी लहानपणापासून पाहत आलोय. दादा मुख्यमंत्री असताना मी बारा वर्षाचा होतो. मी लहानपणापासून दादांचा अतिशय मोठा फॅन आहे. त्यांचा संघर्ष मी बघत आलोय. त्यांच्यात प्रेरणेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्य असा 'सिंधु महोत्सव' लवकर मी घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना आगळीवेगळी पर्वणी देण्याचा माझा मनोदय आहे, अशी मोठी घोषणा भाजपचे युवा नेते आणि प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांनी केली.
ते म्हणाले, हा सिंधु महोत्सव २०२३-२४ असा भव्यदिव्य असेल की ज्याची कल्पना कोणी करू शकणार नाही. तर या सिंधु महोत्सवात मत्स्य महोत्सव सुद्धा होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सुद्धा कीर्तन असणार आहे. मला जशी तुम्ही साथ दिली तशीच साथ यापुढे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना देत रहा. मी सदैव तुमचा ऋणी राहीन, असे सांगत उपस्थित नाट्यप्रेमींना आवाहन केलं.
यावेळी विशाल परब यांच्या सौभाग्यवती सौ. वेदिका विशाल परब, मुलगी भार्गवी, विशाल परब, मुलगा विराज, विशाल परब, अशोक सावंत, दादा साईल, प्रकाश मोर्ये, दिपक नारकर, मोहन सावंत आदी भाजपचे व विशाल सेवा फाऊंडेशन कार्यकर्ते उपस्थित होते.