सावंतवाडी : मीरारोड मुंबई येथील भक्तीवेंदात हॉस्पिटल व संशोधन केंद्राच्या नर्सिंग कॉलेजचा १८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी सिंधुदुर्गच्या कन्या प्राचार्या डॉ. भद्रप्रिया परब यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे उपाध्यक्ष श्री.अरूण कदम, भक्तीवेंदात हॉस्पिटल चे ट्रस्टी व उपसंचालक डॉ.शानभाग, आयुर्वेद विभागाचे प्रमुख डॉ.नानासाहेब मेमाणे, नर्सिंग सुप्रिटेंडर श्रीमती सुचिता दळवी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ.भद्रप्रिया परब उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, कर्मचारी आणि डॉक्टर उपस्थित होते. प्राचार्या डॉ. भद्रप्रिया परब यांनी लिहिलेल्या प्रथम वर्षाच्या मार्गदर्शिका पुस्तिकाचे अनावरण मुख्य अतिथी श्री अरुण कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री कदम यांनी डॉ.भद्रप्रिया परब यांचे अभिनंदन करताना नर्सिंग अभ्यासक्रमातले प्रथम वर्षासाठी हे पहिलेच गाईड उपलब्ध होत असून यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होताना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडण्यास मदत होईल अशी स्तुती केली.
डॉ.भद्रप्रिया परब याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, बांदा येथे झाले आहे. त्यानंतर नर्सिंग क्षेत्रातील डॉक्टरेट त्यांनी मुंबईत पुर्ण केली. त्यांचे पती डॉ.संजय परब हे मुंबईत विख्यात सर्जन म्हणून सुप्रसिद्ध आहेत.