मुंबई :
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देता यावी यासाठी २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलीसांकडून याबाबतची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. जिवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना यातून सुट देण्यात आली आहे.
१६ टनापेक्षा जास्त क्षमता असलेल्या ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना ही बंदी लागू असणार आहे. २७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी मुंबई गोवा महामार्गावर हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत अवजड वाहतुक ही पर्यायी मार्गांनी वळवली जाणार आहे. पोलीस उप आयुक्त वाहतुक तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.