
गोवा : महत्वाची बातमी समोर येतेय. पत्रादेवी मार्गे गोव्यात सर्व अवजड वाहतुकीला प्रवेश करण्यास बंदी असल्याचे आदेश जारी करण्यात आलेत. उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून त्याबाबतची माहिती दिली. यानंतर बांदा इथं वाहनांच्या रांगा लागलेला दिसून आल्यात.
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी काय म्हणाले ?
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ८ जानेवारी २०२४ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत सकाळी ६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत पत्रादेवी मार्गे गोव्यात सर्व अवजड वाहतुकीला प्रवेश करण्यास बंदी लागू केली आहे. याकाळात ही अवजड वाहने बांदा-दोडामार्ग-डिचोली मार्गे गोव्यात प्रवेश करतील.














