
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा सुरू आहे. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये मिळाल्याचा उल्लेख आहे, तसेच हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्याकडून मिळाल्याचेही नमूद केले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत आमच्या फायद्याचे ठरतील की नाही, यावर चर्चा असल्याचे ऐकू येते.
दरम्यान,जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे .जरांगे म्हणालेत,माझ्याविरोधात ३ वर्षापासून षडयंत्र सुरू आहे. हे किती मोठे प्रकरण आहे हे समोर आले पाहिजे. मराठ्यांचे आंदोलन अन्याय करून वेदना देऊन बंद पाडावे असे प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवावे. निवडणूक काळात, उपोषण काळात हे षडयंत्र रचण्यात आले. मराठा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, किती मोठे डाव रचले जातात हे राज्यातील जनतेसमोर ठेवणार आहे असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ बॉम्ब फोडला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्याशी शत्रूप्रमाणे वागू लागलेत. मी कुणाकडून पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाही असं शिंदेंनी म्हटलं. मग इतक्या भयंकर स्वरुपाचे षडयंत्र का रचले जाते याचा शोध मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा. माझ्याकडे ५०० कोटींबाबत पुरावे मागितले होते. ते पुरावे मी माध्यमांसमोर मांडतो. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याने हे ऐकले पाहिजे. मराठा असेल वा ओबीसी सगळ्या समाजाने यात बोध घेतला पाहिजे असं सांगत त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून ऑडिओ क्लिप ऐकवली. याप्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण झाली आहे .
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








