चिंचवडच्या तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांची घौडदौड सुरूच

Edited by: ब्युरो
Published on: March 02, 2023 11:00 AM
views 391  views

पिंपरी - चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचंड प्रतिष्ठेच्या केलेल्या, संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं. भाजपकडून अश्विनी जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे मैदानात आहेत. या निवडणुकीत लक्ष आहे ते राहुल कलाटे यांच्याकडे. त्यामुळे चिंचवडच्या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. 

आठव्या फेरीमध्ये मिळालेली मतं

  1. अश्विनी जगताप (भाजप) - 3602 मतं

  2. नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 2764 मतं

  3. राहुल कलाटे (अपक्ष) - 1052 मतं

आठव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे एकूण 4929 मतांची आघाडी