अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर ?

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 14:09 PM
views 678  views

मुंबुई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विविध प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचं स्वागत करू, असं विधान चिखलीकर यांनी केलं. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे.