मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेसला राम राम केला. मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र ते आजच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. आज दुपारी १२. ३० च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.