सावंतवाडी : शिवस्वराज्य यात्रेला आज सुरुवात होतेय. १७५ गावांना जोडणाऱ्या जाणीव जागर यात्रेचा आज समारोप होतोय. या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. हे सोडवण्यासाठी मतदानाचे अस्त्र आता मतदारांनी वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी अनेक अडचणी आहेत. रोजगाराच्या भयानक समस्या आहेत. महिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत. रोजगारासाठी तरुण बाहेर जात आहेत. घर ओस पडली आहेत. महिलांच्या हाताला काम नाही.
मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाही. रुग्णांना गोव्यात जावं लागत. या सर्वाचा विचार करता आमची आम्हाला लाज वाटते की, आपण कोकणात राहतो. आंबोलीत मेणबत्ती च्या प्रकाशात प्रसूती आम्ही पहिली. याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. शेतीला हमीभाव नाही. वेळागर पंचतारांकित हॉटेल प्रश्न तसाच आहे. आम्हाला बदल करायचा आहे हे सरकार आता नको आहे. महाविकास आघाडी सरकार हवं आहे. कोकणी माणूस भोळा-भाबडा आहे त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. प्रचंड नाराजी आज जनतेत आहे. कोकणी माणूस सुसंस्कृत आहे.
आज भावनिकतेच राजकारण करून निवडणूक लढवली गेली. आज बाऊन्सर प्रवृत्ती डोकं वर काढते तीला वेळीच ठेचली पाहिजे. तरुण वाया जाता नये. जाणीव जागर यात्रेतून आम्ही हे पाहील. याच खूप वाईट वाटलं. आता मतदारांनी आपलं अमूल्य मत कोणतही मूल्य न घेता देणं गरजेचं आहे. आता संकट आपल्या घरावर, कोकणावर आलं आहे. त्यामुळे मी आता पदर खोचला आहे. माझ्या महिला भगिनी सुद्धा पदर खोचून तयार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे -परब यांनी प्रास्ताविकात सांगत. खासदार अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत केले.