सिंधुदुर्ग : मुंबई येथे कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय येथे वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले अनिरुद्ध हडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. महाराष्ट्र कारागृह सन्मान चिन्ह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करत त्यांना गौरविण्यात आलंय. मूळचे मालवण तालुक्यातील हडी, भटवाडी येथील आहेत.
सावंतवाडी जेल,अर्थर रोड जेल व सिंधुदुर्ग जेल येथे कर्तव्य बजावत असताना आरोपींना माणूस म्हणून वागणूक देत त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्याचं काम श्री हडकर यांनी केलं. आरोपींकडून जेलमध्ये काम करुन घेउन त्यांच्यात योग्य परिवर्तन घडवून आणले. सिंधुदुर्ग जेलमध्ये तर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने कैद्यांना घेऊन शेती व भाजीपाला पिकवला. कोरोना काळात स्वतः कोरोना बाधित न होता आरोपींना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ने - आण करणे त्या करीताही कोरोना योद्धा म्हणून कारागृह प्रशासनाने प्रशंसा पत्र देत त्यांच्या कामाचा सन्मान केला. या सर्व कार्याचा लेखाजोखा पाहून हे महाराष्ट्र कारागृह सन्मान चिन्ह प्रदान केले.