
सावंतवाडी : माझ्या हातून माझ्या विभागाच चांगलं काम घडाव म्हणून मी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे. ते माझं मनापासूनच मागण आहे. येत्या काळात ते मी करून दाखवेन. दोन वर्षांत एवढ काम कोकणात घडेल की, दिल्ली सुद्धा मला दिल्लीला बोलावेल. एवढं काम मी करून दाखवेन असा मत माजी मंत्री आम दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच मी नाराज नाही, माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का ? मला मंत्री बनवा म्हणून मी एकनाथ शिंदेंना भेटलो नाही. मला ती गोष्ट पटत नाही. लोकांच्या आनंदात सहभागी होण्यास मला आवडत असंही विधान श्री. केसरकर यांनी केलं.
ते म्हणाले, आमच्या सरकारकडून चांगल काम घडाव व माझ्या हातून माझ्या विभागाच चांगलं काम घडाव म्हणून मी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे. ते माझं मनापासूनच मागण आहे. ते मी करून दाखवेन. दोन वर्षांत एवढ काम कोकणात घडेल की दिल्ली सुद्धा मला दिल्लीला बोलवावं लागेल, एवढं काम मी करून दाखवेन असा विश्वास माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणमंत्री म्हणून शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल केले. मराठी भाषा विभागात चांगलं काम केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मी मंत्रीपदाला न्याय देण्याच काम केलं. मी नाराज नाही, माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का ?मला मंत्री बनवा म्हणून मी एकनाथ शिंदेंना भेटलो नाही. मला ती गोष्ट पटत नाही. लोकांच्या आनंदात सहभागी होण्यास मला आवडत असंही श्री. केसरकर यांनी सांगितले. पूर्वीपेक्षा अधिकची चांगली खाती शिवसेनेला मिळाली आहेत. महाराष्ट्र महायुती चांगलं काम करेल असा दावा श्री. केसरकर यांनी केला.